मराठी अनुवाद के बाद हिंदी अनुवाद है जरूर पढ़े.....
सरस्वती माता सामाजिक बहुउद्देशिय संस्था.
सदर संस्थेच्या प्रथम वर्धापन दिनानिमित्त 24/11/2021 रोजी ठिक :- 6"00 वा. संकल्प पूर्तीसाठी Google meet व YouTube वर live प्रेक्षपणद्वारे विचारमंथन मिटींग आनंदमयी वातावरणात उत्साहपुर्ण संपन्न झाली.
*कार्यक्रमाचे इतिवृत्त*
सर्वप्रथम कार्यक्रमासाठी उपस्थित मान्यवरांचे शब्द सुमनाने स्वागत करून, संस्थेच्या कार्याला आजपर्यंत सर्वोतोपरी सहकार्य करणा-या बंधु - भगिनी यांचे आभार व धन्यवाद मानून मिटींगला सुरवात करण्यात आली.
संस्थेच्या वतीने संस्थेचे नियोजक श्री. राजु रत्ने साहेब यांनी आपल्या प्रास्ताविक भाषणामध्ये संस्थेच्या वतीने समाज हितासाठी करण्यात येणा-या कार्याचा आराखडा सादर केले. तसेच संस्थेच्या उद्देशपुर्तीसाठी संस्थेचे संस्थापक मंडळ ग्राउंडलेव्हलवर प्रत्यक्ष कार्य करत असल्यामुळे संस्थेचे कार्य जोमाने समाज बंधु - भगिनी यांच्या पर्यंत पोहचण्यास मदत झाली. यावर्षी संस्थेच्यावतीने 450 विद्यार्थ्यांना मोफत शैक्षणिक साहित्य वाटप व संस्थेच्यावतीने करण्यात आलेल्या इतर मदती विषयी माहिती दिली. तसेच पुढिल काळात सुद्धा संस्था अशाच जोमाने काम करणार अशा पद्धतीने आश्वातीत करून, संस्थेला मदत करण्यासाठी पुढे येणा-या समाज बंधु - भगिनी यांचे आभार व धन्यवाद मानून, उपस्थित समाज बंधु-भगिनी यांना पुढिल कार्यासाठी सुझाव तथा मार्गदर्शन करावे असे आवाहन केले.
प्रास्ताविका नंतर सन्माननिय मान्यवरांनी आपल्या मनोगतातून संस्थेच्या वतीने प्रत्यक्ष ग्राउंडलेव्हलवरील चालू असलेल्या कार्याबद्दल आनंद व्यक्त केले. त्याबरोबरच संस्थेच्या माध्यमा - तून ठरविण्यात आलेले उद्देश खरोखरच समाज हितासाठीचे आहे. यासाठी संस्थेच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणार असे आश्वासन दिले.
तसेच सदर संस्था महाराष्ट्रातील प्रत्येक विभागात एका वर्षाच्या आत पोहोचणारी पहिली संस्था आहे, असे गौरवोद्गार काढले. संस्थेच्या शिक्षण तसेच महिला सबलीकरण या उपक्रमा - सोबत जुळून यासाठी लागणारी सर्वोतोपरी मदत संस्थेकडे पाठविण्याची तयारी दर्शवून सदर कार्याला समाजातून सहकार्य करावे असेही मान्यवरांकडून आवाहन करण्यात आले.
संस्थेच्या महिलासबलीकरन या उपक्रमाला - समाजातील जेष्ठ व अभ्यासू व्यक्तिमत्व सन्माननिय श्री. मधुकरजी भानावत साहेब यांनी - 2100/- ₹ मदत जाहीर केली. तसेच समाजातील जेष्ठ महिला तथा संस्थेच्या उपाध्यक्षा सन्माननिय सौ. पुष्पाताई चव्हाण मॅडम यांनी - 3100/-₹ जाहीर केले. वरील सन्माननिय यांनी सहकार्यरूपी मदत जाहीर करून, संस्थेच्या कार्याला उर्जात्मक बळ देण्याचे मोलाचे कार्य केले त्याबद्दल त्यांचे धन्यवाद..!
तसेच संस्थेच्या सन्माननिय उपाध्यक्षा सौ. पुष्पाताई चव्हाण मॅडम यांनी उपस्थित बंधु - भगिनींचे कौतुक करून संस्थेच्या पुढिल कार्यासाठी सहकार्य व साथ देण्यासाठी आवाहन केले.
मनोगतीय भाषणा नंतर संस्थेचे अध्यक्ष श्री. रणजित शेरे साहेब यांनी संस्थेला सहकार्य करणा-या तमाम बंधु - भगिनी यांचे धन्यवाद मानून, संस्थेचे कार्य तळागाळातील समाज बांधवां पर्यंत पोहचविण्याचे कार्य संस्थेमार्फत होत असून, पुढेही संस्थेचे कार्य अखंडितपणे चालु ठेवून, तळागाळातील समाज बांधवांच्या उद्धारासाठी संस्था सदैव *कटिबद्ध* असणार अशा प्रकारे आश्वासित केले.
शेवटी संस्थेचे सहसचिव श्री. बी. बी. धाडी सर यांनी संस्थेच्या प्रथम वर्धापनाच्या कार्यक्रमाला उपस्थित मान्यवर, संस्थेला सहकार्य करणा-या तमाम बंधु - भगिनी यांचे धन्यवाद व आभार मानले.
संस्थेच्या प्रथम वर्धापनाच्या कार्यक्रमाला खालील मान्यवर उपस्थित होते.
@ संस्थेचे नियोजक व संस्थापक मंडळ उपस्थित होते.
कार्यक्रमाला अनमोल मार्गदर्शन करणारे उपस्थित सन्माननिय प्रमुख पाहुणे -
01) श्री. उत्तमरावजी रत्ने साहेब - यवतमाळ.
02) श्री. मधुकरजी भानावत साहेब - यवतमाळ.
03) श्री. विरेंद्रजी रत्ने साहेब - मुंबई.
04) सौ. संजिवनीताई शेरे - यवतमाळ.
05) श्री. कैलासजी राठोड साहेब - मुंबई.
06) श्री. संजयजी भानावत साहेब- यवतमाळ.
07) श्री. बद्रीजी रत्ने साहेब - जळगाव.
08) श्री. सुरेशकुमारजी शेरे साहेब - यवतमाळ.
09) श्री. संजयजी चव्हाण साहेब- नागपुर.
10) श्री. कांतीलालजी राठोड साहेब - जळगाव.
11) श्री. अरविंदजी शेरे साहेब - यवतमाळ.
12) सौ. मेघाताई रत्ने - नागपुर.
13) श्री. संजयजी रत्ने साहेब - मुंबई.
14) श्री. प्रविणजी शेरे साहेब - कल्याण,मुंबई.
15) श्री. गजाननजी डोंगरे साहेब - मुंबई.
16) श्री. गणेशजी रूडे साहेब - यवतमाळ.
17) श्री. सचिनजी सगणे साहेब - यवतमाळ.
इत्यादी मान्यवरांनी योग्य मार्गदर्शन केले. *अनावधानाने चुकून कोणाचे नाव राहिले असतील तर क्षमस्व....
कार्यक्रमाला उपस्थित इतर मान्यवर -
समाजातील जेष्ठ, प्रतिष्ठित, वरीष्ठ व युवा बंधु - भगिनी इत्यादी उपस्थित होते.
अशीच आपली साथ आणि सहकार्य संस्थेच्या पाठीशी असू द्यावे ही विनंती.
✍️ "समाज हिताय 卐 समाज सुखाय."✍️
--------------------------------------------------------------------------------------
हिंदी अनुवाद.........
सरस्वती माता सामाजिक बहुउद्देशीय संस्थान-
निम्नलिखित गणमान्य व्यक्तियों ने संगठन के प्रथम वर्षगांठ समारोह में भाग लिया।
@ नियोजक और संगठन के संस्थापकों का बोर्ड
️"समाज हितैय्य, समाज सुखैय्य।"

0 Comments