" समाज हितैय्य, समाज समाज सुखैय "
सरस्वती माता सामाजिक बहुउद्देशिय संस्था
सदर संस्थेचे दि. 24/11/2021 रोजी प्रथम वर्धापन दिन साजरा करण्यात येत आहे.
संस्था स्थापनेचा इतिहास पाहिला तर अंगावर शहारे उभे राहतात, जगभरात कोरोना या महामारीने थैमान घातले होते, देशामध्ये लाॅकडाऊन लागले होते, घरे पिंज-याचे रूप धारण केले होते, माणसे पिंज-यात बंद असल्यासारखे, घरात स्वतःला एकांतवासात असल्यासारखे कैद करून घेतली होती. अशा परिस्थितीत घराच्या बाहेर पडण्याचे विचार लोकांना स्वप्नात सुद्धा आले नसतील, कारण परिस्थितीच गंभीर होती. दया - माया तर सोडाच पण रक्ताचे नाते - गोते काही काळासाठी लोकांनी विसरले होते. शेजारची व्यक्ती तर दुरची गोष्ट होती, परंतु कुटूंबातील व्यक्तिला जरी कोरोना झाले, तरी घरातील माणसे त्या व्यक्तीपासून अलिप्त राहणे पसंद करत होते. कोरोना झालेल्या व्यक्तीला आधाराची, सकारात्मक मानसिकतेची गरज असताना कुटुंबासाठी ते परके झाले होते. कोरोना झालेले काही लोकं जे दवाखान्यात गेले ते परत आलेच नाही. अशा प्रकारची भयावह परिस्थिती होती. प्रत्येकजणाला स्वतःचे जीव प्रिय वाटत होते. असे वाटणे साहजिकच होते. स्वतःला सुरक्षित ठेवण्यासाठी व कोरोनापासून बचाव करण्यासाठी प्रत्येकजण प्रयत्नशिल होते. अशा भयावह परिस्थितीत समाजसेवेचा विचार मनी येणे म्हणजे मृत्यू ओढवून घेतल्यासारखे होते. परंतु असे म्हणतात ना... ज्यांच्याकडे इच्छाशक्ती प्रबल असते, त्यांना कोणत्याही सकटांची भिती नसते.
साधारणपणे 2020 मध्ये जुलैचा महिना होता. रात्रीचे 8 वाजले होते. त्यादरम्यान श्री. राजु रत्ने साहेब, - नागपुर, श्री. चेतन रत्ने साहेब, - पुणे व श्री. अनिल रत्ने साहेब, - कोल्हापूर हे तिघे एकमेकांसोबत जिव्हाळ्याचे हितगुज साधण्यासाठी Conference Call वर बोलत होते. भरपूर वेळ बोलणे चालू असताना सहजच समाजाविषयी चर्चा रंगली, चर्चा एवढी रंगली की, रात्रीचे 11 कधी वाजले समजले नाही. चर्चेअंती असे ठरले की, समाजाचे कार्य करायचे असेल तर संस्था निर्मिती करणे गरजेचे आहे. जोशपूर्ण चर्चा रंगली व कोणतेही विषय डोक्यात नसताना जिव्हाळ्याचे हितगुज साधण्यासाठी केलेल्या Conference call चे रुपातंर संस्था निर्मितीत झाले व 4 तासाच्या चर्चेनंतर रात्री 12:00 वाजता तिघांचे संस्था निर्माण करण्यासाठीच्या विषयावर शिक्कामोर्तब झाले.
दुसरा दिवस उजाडला रात्री झालेल्या संस्था निर्मितीच्या जोशपूर्ण चर्चेबद्दल सकाळी कल्पना केल्यावर असे वाटले की, कोरोनाकाळात संस्था निर्माण करणे अशक्य आहे. कारण परिस्थीतीच तशी होती. त्याबरोबर संस्था निर्माण करायची असेल, तर त्यासाठी आवश्यक पदाधिकारी व संस्थापक मंडळ, संस्थेचे नाव, संस्थेचे ब्रिद वाक्य, संस्थेचे उद्देश अशा अनेक गोष्टींची जुळवाजुळव करणे, त्यानंतर संस्थेचे बाॅयलाॅज तयार करणे, त्या बाॅयलाॅजवर सर्वांच्या सह्या घेवून संस्था नोंदणी प्रस्ताव धर्मादाय कार्यालयात सादर करणे, त्यानंतर झालेल्या त्रुटीचे पाठपुरावा केल्यानंतर कुठेतरी संस्थेला मंजुरी मिळते. फक्त जिल्ह्यातील संस्थापक मंडळ घेवून एखादी संस्था निर्माण करायचे झाल्यावर नाकीनऊ येते. राज्यपातळीवर कोरोनाकाळात संस्था निर्माण करणे हा विषयच आवाक्याबाहेचा होता.
पण आम्ही संस्था निर्मितीच्या विषयावर शिक्कामोर्तब करून जिद्दीला पेटलेले होतो. परिस्थिति जरी होती गंभीर तरी आम्ही आपल्या विषयावर होतो खंबीर आम्ही अशक्य मधले 'अ' अक्षर काढून टाकले व शक्य या शब्दावर लक्ष केंद्रित करून कामाला लागलो.
दुस-या दिवशी आम्ही विचार केला की, महाराष्ट्र पातळीवर संस्था निर्माण करायची असेल महाराष्ट्रातील प्रत्येक विभागातील किमान एक तरी बंधु - भगिनी यांची संस्थापक मंडळात सहभाग करून घेणे आवश्यक होते. म्हणून संस्था निर्मितीसाठी समाजातील इतर बंधु - भगिनी सोबत फोन काॅलद्वारे बोलणे सुरू झाले. दररोज 15 ते 20 व्यक्तिसोबत संपर्क केल्यानंतर रिस्पाँन्स काहीच मिळत नव्हते. प्रत्येक जण आपापली अडचणी सांगायचे. असे करत - करत एक महिण्याचा कालावधी निघुन गेला व August महिना आला. तरी समाज बांधवांकडून रिस्पाँन्स काहीच मिळत नव्हता, तरी पण आम्ही हतास झालो नाही. आपले प्रयत्न जोमाने चालू ठेवले व August महिण्याच्या शेवटी *कोणत्याही पदाची अपेक्षा न करणारे, समाजासाठी निश्वार्थ भाव असलेले, ग्राउंडलेव्हलवर कार्य करण्यासाठी तत्पर असणारे, वैचारिक प्रगल्भता असलेले व समाजासाठी तन - मन व धनाने सहकार्य करणारे जसे कोळसाच्या खाणीतून जसा हिरा सापडतो अगदी त्याचप्रमाणे संस्थेमध्ये काम करण्याची तयारी दर्शविणारे 15 जण संस्थापक म्हणून लाभले. मग October महिण्यात संस्था स्थापनेची तयारी झाली व शेवटी सरस्वती माता सामाजिक बहुउद्देशिय संस्था, (1) शिक्षण, (2) महिला सबलीकरण, (3) कौशल्य प्रशिक्षण व रोजगार सहायत्ता (4) सामाजिक न्यायमंडळ हे मुख्य चार उद्देश डोळ्यासमोर ठेवून दिनांक - 24/11/2020 रोजी स्थापना झाली.
प्रबळ इच्छाशक्तिच्या जोरावर संस्थेची निर्मिती झाली पण आता समाजासाठी पुढे करायचे काय? कारण परिस्थिति फार गंभीर होती. कोरोना लाकडाऊनचा काळ होता. या लाकडाऊनच्या काळात ग्राउंडलेव्हलवर कार्य करणे शक्य नव्हते. मग Social media चा उपयोग करून, Online Google meeting घेवून संस्थेच्या मुख्य उद्देश्या पैकी एक उद्देश असलेले समाजिक न्यायमंडळासाठी समाजातील जेष्ठ, अनुभवी व कायद्या विषयीची माहीती असलेल्या बंधु - भगिनीची निवड करून सामाजिक न्यायमंडळाची टीम तयार करण्यात आली. यानंतर पुढे काय करायचे असे विचार मनी येवू लागले. अशात संस्थेला 6 महिने पुर्ण झाले होते. त्यादरम्यान शासनाकडून काही नियमावली बनविण्यात आली व लाकडाऊनला थोडी ढिल देण्यात आली होती. तेंव्हा संस्थेतील संस्थापक मंडळ सक्रिय झाले. सर्वांनी चर्चा करून ठरविले की, जर समाजाचा विकास करायचे असेल शिक्षणावर जोर देणे गरजेचे आहे. कारण शिक्षणाशिवाय प्रगती नाही. याचा सारासार विचार करून मोफत शैक्षणिक साहित्य वाटप व मार्गदर्शन हा उपक्रम हाती घेण्यात आले. संस्थेचे नियोजक व संस्थापक मंडळाची तत्परता व सकारात्मक मानसिकतेमुळे अवघ्या सहा महिण्याच्या आत हाती घेतलेले उपक्रम योग्य नियोजन करून, प्रत्यक्ष ग्राउंडलेव्हलवर गावोगावी जाऊन, बोललेले प्रत्यक्ष कृतीत उतरवून दाखविले व समाजातील 450 विद्यार्थी व विद्यार्थीनींना साहित्य वाटप करण्यात आले. तसेच संस्थेने दत्तक घेतलेल्या गरजवंत मुलीला 12 वी प्रवेशासाठी आर्थिक मदत करण्यात आली. त्याबरोबरच कोरोना काळात जगाचा निरोप घेऊन गेलेले संस्थापक यांच्या परिवारातील मुलींना शिक्षणासाठी आर्थिक मदत करण्यात आली.
अशा प्रकारे समाजाचा उद्धार करण्याचे निश्चय मनी बाळगून, कोरोना सारख्या बिकट परिस्थितिवर मात करून, संस्थेमार्फत कार्य करण्यात आले. हे सर्व घडण्यामागे संस्थेचे नियोजक व संस्थापक मंडळाचे प्रयत्न, तसेच मदतीसाठी पुढे सरसावलेल्या "समाजकर्मी पुण्यवंत" बंधु - भगिनींमुळे शक्य झाले आहे. पुढेही यापेक्षा जास्त गतीने संस्थेमार्फत कार्य होईल.
सदर संस्थेच्या स्थापनेला एक वर्ष पुर्ण होत असून, संस्थेचे वर्धापन दिन दि. - 24/11/2021 रोजी साजरा करण्यात येत आहे. तरी संस्थेच्या वर्धापन दिनानिमित्त तमाम समाज बंधु - भगिना यांना हार्दीक शुभेच्छा..!
आपले सहकार्य व आमचे प्रयत्न हीच संस्थेची ताकद आहे. 🌷🌹🙏
Visit Here -
sarswatimatasms2020@gmail.com

0 Comments