( हिंदी अनुवाद इस कहानी के निचे दिया गया है )
आजचा समाज विचार...!
🌹सहकार्याचे महत्व🌹
एका शहरात सुशिल धाडी नावाचा मुलगा Hotel मध्ये वेटर म्हणून काम करत होता. त्याच Hotel मध्ये एक श्रीमंत व्यक्ति जेवणासाठी आले व सुशिलला जेवणाची order घेण्यासाठी बोलावले. सुशिल पटकन त्या व्यक्तिकडे जावून order घेवू लागला. Order घेत असताना सुशिल ने त्याचीकडे पाहिले असता तो व्यक्ति गावतल्याच मोठ्या अधिकारी सारखा दिसु लागला. सुशिलला वाटले कि त्यांना त्यांचे नाव विचारावे पण मनात विचार येवू लागले कि नाव विचारले तर साहेब माझ्यावर रागावणार तर नाही ना? तरीपण सुशिलने त्या साहेबाला धाडस करून विचारले, "साहेब, तुम्ही राजेश धाडी ना?."
त्या व्यक्तिने सांगितले.
"हो. तू?"
"मी सुशिल धाडी. तुमच्या गावातला.
"बरोबर. पण तुझा चेहरा ओळखू येत नाहीये" तो व्यक्ती त्याला निरखत म्हणाला.
"साहेब मी गावात जास्त फिरत नाही, आणि तुम्ही गावात काही कार्यक्रम असल्यावर येता व कार्यक्रम झाल्यावर लगेच निघून जाता, त्यामुळे कदाचित तुम्ही मला पाहीला नसालं. पण मी तुम्हाला ओळखतो. साहेबांने विचारले "तुझ्या वडीलाचे नाव काय?" सुशिलने सांगितले शामराव, अरे! तो तर गावातला चांगला माणूस, मी मागे काही वर्षापूर्वी गावी आलो होतो तेव्हा भेटला होता.
"पण तू इथे का.....?"
"साहेब 12 वीत असताना वडीलाची तब्बेत बिघडली व घरात मी मोठा असल्यामुळे घराची जबाबदारी माझ्यावर पडली, त्यामुळे शिक्षण सोडून गेली तीन वर्षे इथेच काम करतोय."
"काय झालं वडिलांना?
"Paralysis झालंय. त्यामुळे ते एकाच जागी पडून असतात",
"अरे! आणि तुझे भाऊ?" "दोन बहीणी आणि एक भाऊ तिघंही लहान आहेत. शिकताहेत. आई अशिक्षित. मजूरी करते".
"अच्छा" साहेब ऐकून विचारात गढून गेले. सुशिल order घेवून निघून गेला. साहेबांचे जेवण झाल्यावर सुशिल नाही नाही म्हणत असतांनाही त्याच्या हातात पन्नास रुपये Tip देऊन निघून गेले.
काही दिवसांनी ते परत आले. परत सुशिलला जेवणाची Order दिली. साहेबाला सुशिलचा स्वभाव आवडला. त्यांनी सुशिल परत नाही म्हणत असतानाही तीनशे रुपये Tip दिले व निघून गेले. सुशिलला खुप आनंद झाला. इतके पैसे Tip म्हणून त्याला आजपर्यंत मिळाले नव्हते.
काही दिवसांनी साहेब परत आले. जेवणाची order सांगितली व जेवत असताना त्यांनी सुशिलला जवळ बसवून म्हणाले "सुशिल तुझा स्वभाव चांगला आहे, Hotel मध्ये राहून तुला Customer चा अनुभव पण आला आहे. तू असं करतोस का? मी अधिकारी म्हणून ज्या office मध्ये काम करतो, ते गर्दीच्या ठिकाणी आहे. तिथे एक टपरी टाकून चहा व वडापावचा स्वतःचा व्यवसाय सुरु कर. माझ्या office ची दररोजची order तुला मिळेल व गर्दीचे ठिकाण असल्यामुळे दुसरे पण Customer तुझ्याकडे येतील, तुझा स्वतःचा धंदा सुरू होईल व तु चांगले पैसे मिळवशील.
" साहेब, कल्पना चांगली आहे पण त्याला वीस - पंचवीस हजार लागतील. तेवढे पैसे नाहीयेत माझ्याजवळ"
"हरकत नाही. मी देतो तुला. पण मला तू ते सात महिन्यात परत करायचे. चालेल?"
सुशिल तयार झाला. सुशिलला साहेबांनी office चे address दिले व दुस-या दिवशी office मध्ये येण्यास सांगितले. दुस-या दिवशी सुशिल दिलेल्या address वर पोहचला. साहेबांना भेटला. साहेब office बाहेर आले, शेजारची मोकळी जागा दाखवून पैसे दिले व तयारी करण्यात सांगितले. चार दिवसातच सुशिलची तिथं टपरी उभी झाली. महिन्याभरात सुशिलची 30 हजार रूपयाची कमाई झाली. साहेबांना भेटून त्याने त्यांना 25 हजार दिले. साहेबांनी ते त्याला परत केले.
"मी तुला सात महिन्यांची मुदत दिली होती. सात महिन्यानंतरच मला परत कर. तोपर्यंत तुझा धंदा वाढवण्यासाठी त्याचा उपयोग कर."
सुशिलचा आता उत्साह वाढला. त्याने एक - दोन मेनू वाढविले. चांगली Quality व योग्य दर असल्यामुळे त्याच्या टपरीवर खुप गर्दी व्हायला लागली. आता त्याला वेळ पुरेनासा झाला. साहेब येता - जाता सुशिलची चौकशी करतच असायचे.
पाच महिने झाल्यानंतर, सुशिल साहेबांच्या office मध्ये गेला. सुशिलच्या चेहऱ्यावर आनंद आणि आत्मविश्वास फुलून आला होता.
"साहेब खुप चांगलं चाललंय. आता जागाही अपुरी पडत आहे, पुढे काय करायचं"
"सुशिल आता करार करून, जागा भाड्याने घ्यायची, हाॅटेल व्यवसाय सुरू करायचं. तिथे हे सगळं शिफ्ट करायचं. मी जागा बघून ठेवलो आहे. अगदी मोक्याच्या ठिकाणी आहे. आणि हो! हाॅटेल व्यवसायासाठी कर्ज मिळतं, ते तुला मिळवून देतो."
"काय? हाॅटेल व्यवसाय?" सुशिल थरारला" साहेब मला जमेल का?"
"सगळं जमेल. मी आहे ना" साहेब त्याच्या खांद्यावर हात ठेवून म्हणाले.
सुशिलने ने खाली वाकून त्यांचे पाय धरले. "साहेब खुप करताय माझ्यासाठी"
"अरे हे माझं कर्तव्यच आहे, त्याला उठवत साहेब म्हणाले" मी समाजासाठी आज पर्यंत काही केलो नाही. तुझ्यामुळे मला सेवेची संधी मिळाली आहे. जिवनात एक समाज घटक म्हणून एवढं तरी काम करतो. हे ऐकून "सुशिलच्या डोळ्यात पाणी आलं.
दोन वर्षात सुशिल खुप पुढे गेला. हाॅटेल वाढली. एकाची चार हाॅटेल झाली. सुशिलचा आता सुशिल शेठ झाला. चाळीत रूम करून राहणारा सुशिल आता आपल्या परिवाराला घेवून टू बी. एच. के. फ्लँटमध्ये रहायला गेला. भाऊ - बहिणी चांगल्या शाळा काँलेजमध्ये जाऊ लागले. दरम्यान त्याचे वडील वारले. वडील गेल्यावर एका वर्षाने त्याचं लग्न झालं. मुलगी पसंत करायला तो साहेबांना घेऊन गेला होता. काही दिवसांनी त्याची आई वारली.
इकडे साहेब निवृत्त होऊन पाच वर्षे झाली होती. साहेब आता थंकले होते. त्यांच्या मुलाने अमेरिके मध्येच स्थायिक होण्याचा निर्णय घेतला होता. मुलगी अगोदरच कॅनडाला स्थायिक होती. त्यामुळे साहेब दुःखी होते. त्यात त्यांच्या पत्नीची तब्येतही आजकाल ठीक नसायची.
एक दिवस साहेबांची पत्नी गेल्याचा निरोप सुशिलला मिळाला. सर्व कामं सोडून तो त्यांच्या घरी धावला. साहेबांचा मुलगा, मुलगी वेळेवर पोहचू शकले नाही. ते येण्या अगोदरच अंत्यविधी पार पाडावी लागली. पण सुशिलने साहेबांना कोणतीच कमतरता जाणवू दिली नाही. शिवाय तेराव्या दिवसापर्यंतचा सगळा खर्चही त्यानेच केला.
सगळं आटोपल्यावर साहेबांच्या मुलाने त्यांना अमेरिकेला चलायचा खुप आग्रह केला पण साहेबांनी मायदेश सोडायला साफ नकार दिला. सगळे निघून गेल्यावर साहेबांचं एकाकीपण सुरु झालं, ते सुशिलला बघवत नव्हतं पण त्याचाही नाईलाज होता.
एक दिवस बायकोला घेऊन तो साहेबांच्या घरी पोहचला. त्याला पाहून साहेबांना आश्चर्य वाटलं.
"साहेब तुमचे माझ्यावर खुप उपकार आहेत. आज मला अजून एक मदत कराल.?"
" अरे आता तुला मदतीची काय गरज? तू आता खुप मोठा झालाय. बरं ठिक आहे सांग तुला काय मदत हवी आहे?"
"साहेब माझे वडील व्हाल?"
साहेब स्तब्ध झाले. मग म्हणाले" अरे वेड्या मी तर तुला कधीचंच आपला मुलगा मानलंय"
"तर मग मला मुलाचं कर्तव्य करु द्या. मी तुम्हाला माझ्या घरी न्यायला आलोय. तुमचं उरलेलं आयुष्य तिथंच काढावं अशी माझी तुम्हाला विनंती आहे" सुशिल हात जोडत म्हणाला.
"अरे पण तुझ्या बायकोला विचारलं का?"
"साहेब तिला विचारुनच मी हा निर्णय घेतलाय. तिलाही वडील नाहीयेत. तुमच्यासारखे सासरे वडील म्हणून मिळाले तर तिलाही हवेच आहेत. शिवाय पुढे मुलं झाल्यावर त्यांनाही आजोबा हवेतच की!"
"बघ बुवा. म्हातारपण फार वाईट असतं. मी आजारी पडलो तर तुलाच सर्व करावं लागेल.
"मुलगा म्हंटलं की ते सगळं करणं आलंच. साहेब तो सारासार विचार करुनच मी आलोय"
साहेब विचारात पडले. मग म्हणाले "ठीक आहे येतो मी पण माझी एक अट आहे. मला तू साहेब म्हणायचं नाही"
"मी माझ्या वडीलांना बापू म्हणायचो तुम्हालाही तेच म्हणेन"
साहेब मोकळेपणाने हसले.
"अजून एक अट. तुझ्यासारखे समाजात अनेक होतकरू सुशिल आहेत, त्यांना सहकार्याची गरज आहे. त्यांना सुशिल शेठ करायला मला मदत करायची" सुशिलला गहिवरुन आलं. त्यानं साहेबांना मिठी मारली. दोघंही ब-याच वेळेपर्यंत रडत होते.
धन्यवाद....!
बांधवांनो, सदर कथेचे स्वरूप जरी काल्पनिक असले तरी आपण जर प्रयत्न केलो तर, आपल्या समाजातील गरीब व गरजवंत बांधवांची गरज समजून घेवून सहकार्य केले तर निश्चितच आपण सुशिल सारख्या होतकरू समाज घटकांना सुशिल शेठ म्हणून घडवू शकतो. सुशिल सारखे समाज घटक पुढे गेल्यावर आपला समाज आपोआपच पुढे जाईल...
मगं सुशिल सारख्या समाज बांधवांचे बापू होण्यासाठी पुढे यालं का? विचार करा व पुढे.. सुशिल सारखे आपली वाट बघत आहे.
B Positive
--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
( हिंदी अनुवाद )
"समाज हितैय्य, समाज सुखैय
आज का समाज विचार ...
🌹सहायता का महत्व🌹
एक बड़े शहर में, सुशील ढाढ़ी नाम का लड़का एक होटल में वेटर का काम करता था। उसी होटल में, एक अमीर व्यक्ति खाना खाने के लिए आया और सुशील को खाने की order लेने के लिए बुलाया। सुशील जल्दी से उस व्यक्ति के पास गया और order लेने लगा। order लेते समय, सुशील ने उस व्यक्ति तरफ देखा तो वह व्यक्ति उसके गाँव के ही एक जाने - माने बड़े अधिकारी तरह दिख रहा था । सुशील ने सोचा कि उसे अपना नाम पूछना चाहिए। लेकिन सुशील सोचने लगा कि अगर मैंने उसका नाम पूछा तो वह मुझसे नाराज़ तो नहीं हो जाएगा? हालाँकि, सुशील ने साहसपूर्वक उस व्यक्ति से उसका नाम पूछा, "साहब, क्या आप राजेश ढाढ़ी हैं?"
उस व्यक्ति ने कहा "हाँ पर तु कौन है?"
मैं तुम्हारे ही गाँव का सुशील ढाढ़ी हूँ।
"ठीक है। लेकिन मैं तुझे नहीं पहचान सका, " उस व्यक्ति ने सुशिल को निखरते हुए कहाँ..
"साहब, मैं गाँव में बहुत कम घुमता हूँ, आप गाँव में जब कोई बड़ा त्योहार हो तो आते है और त्योहार ख़त्म हो जान के तुरंत बाद चले जाते हो इसलिए शायद आप ने मुझे नहीं देखा होगा। लेकिन मैं आपको जानता हूँ।
साहब ने पूछा,"तेरे पिताजी का नाम क्या है? "सुशील ने कहा," शामराव। अरे, वह तो गाँव का बहुतही अच्छा इन्सान है, मैं उसे कुछ साल पहले गांव आया था तब था।
"पर तु यहाँ कैसे आया .....?"
"साहब, मैं बारहवी में पढ़ रहा था, तब से मेरे पिताजी की तबीयत खराब हो गई और मैं घर का बड़ा सदस्य होने की वजहसे मुझपर घर की पूरी जिम्मेवारी आ गई। इसलिए मैं college छोड़ के तीन साल से यहां पर ही काम कर रहा हूं।"
"क्या हुआ पिताजी?"
"लखवा" मार गया है। इसिलिए वे एक ही जगह पर लेटे रहते हैं", "अरेरे ! और तेरे भाई?" "दो बहनें और एक भाई सभी छोटे हैं। वे पढ़ रहे हैं। माँ अशिक्षित होने की वजहसे मजदूरी करती है ।"
"अच्छा" साहब, ये सुनते सुनते गहरी सोच में पड गए। सुशील ने order लेके चला गया। साहब ने खाना होने के बाद सुशील ने नहीं नहीं कहनेपर भी उसके हाथ में पचास रुपये Tip दे के चले गए।
फिर साहब कुछ दिनों के बाद खाना खाने के लिए आये और सुशील को खाने कि order दी। साहब को सुशील का स्वभाव पसंद आया। सुशील के ना कहने पर भी उन्होंने फिर से तीनसौ रुपये की tip दी और चले गये। सुशील बहुत खुश हुआ। Tip के इतने पैसे उसे कभी भी नहीं मिले थे।
साहब फिर कुछ दिन बाद वापस आए। उन्होने खाने की order दि और खाना खाने के समय सुशील को पास बिठाकर कहने लगे। "सुशील, तेरा स्वभाव अच्छा है", ज्यादा साल होटल में काम करने की वजहसे तुझे ग्राहको का अनुभव भी है। क्या तुम एक काम करोगे? जिस कार्यालय में मैं अधिकारी हूं, वह एक भीड़-भाड़ वाली जगह है। वहां एक छोटी टपरी लगाके अपना खुद का चाय और वडापाव का धंदा चालू कर दे । तुझे मेरे कार्यालय से हर रोज order मिलेग और वह भीड़-भाड़ वाली जगह होने की वजहसे अन्य ग्राहक भी आएंगे, तेरा खुद का धंदा शुरू होनेपर तेरी अच्छी कमाई भी होगी।
"साहब, सोच अच्छी है, लेकिन इसमें वीस - पच्चीस हजार रूपये खर्चा आएगा। मेरे पास उतने पैसे नहीं है।"
"कोई बात नहीं। मैं तुझे पैसे दे दूंगा। लेकिन मुझे वो पैसे सात महीने के बाद लौटाना होगा। चलेगा?"
सुशील तैयार हो गया। साहब ने सुशील को ऑफिस का पता दिया और अगले दिन ऑफिस आने के लिए कहा। अगले दिन सुशील दिए गए पते पर पहुँच गया। साहब से मिला, साहब दफ्तर से बाहर आए और पडोस की जगा दिखाई और पैसे देकर आगे की योजना बनाने के लिए कहा। चार दिनों के भीतर ही सुशील की टपरी खड़ी हो गई। एक महीने के भीतर, सुशील ने 30,000 हजार रुपये कमाए। उसने साहब से मुलाकात की और उन्हें 25,000 रुपये दिए। साहब ने पैसे वापस लौटाते हुए सुशील से बोले "मैंने तुझे सात महीने दिए हैं। सात महीने बाद ही पैसे वापस देना। तब तक, अपना धंदा बढ़ाने के लिए इसका इस्तेमाल कर।"
सुशील का उत्साह अब बढ़ गया। उसने एक - दो मेनू ज्यादा बढा दिया। अच्छी quality और सही किमंत के कारण बहुत सारे customers आने लगे। अब सुशील को समय ही नहीं मिल रहा था। साहब आते - जाते सुशील से पूछताछ करते थे।
सात महीने बाद सुशील साहब के दफ्तर गया। सुशील का चेहरा खुशी और आत्मविश्वास से भरा था।
"साहब बहुत अच्छा चल रहा हैं। अब जगह भी कम गिरने लगी है, अब आगे क्या करू"
"सुशील अब एक जगह किराए पर लेकर होटल व्यवसाय शुरू कर। यह सब सामान वहाँ स्थानांतरित कर दे । मैने जगह देख भी लि है। जगह अच्छे point पर है। और हाँ! तुझे होटल व्यवसाय के लिए कर्ज भी मिलता है।" मै कर्ज दिला दुँगा।
"क्या? होटल व्यवसाय?" "साहब, क्या ये मुझे संभव हो पायेगा?"
"सब ठीक हो जाएगा। मै हूँ ना," साहब कंधे पर हाथ रखते हुए बोले।
सुशील ने झुक कर उनके पैर पकड़ लिए। "साहब, आप मेरे लिए बहुत कुछ कर रहे हो।"
"अरे, यह मेरा कर्तव्य बनता है," उन्होंने उसे ऊपर उठाते हुए कहा, "मैंने आज तक समाज के लिए कुछ नहीं किया है।" तेरी वजहसे मुझे ये कार्य करने का मौका मिला है। जीवन में कम से कम एक समाज घटक के रूप में इतना तो भी कार्य कर सकता हूँ। सुशील के आंखों में आंसू आ गए।
दो साल में ही सुशील बहुत आगे चला गया। होटल बढ़ती गई। एक से चार होटल हो गई। सुशील अब सुशील शेठ बन गया। सुशील, जो एक कमरे में रहता था, अब अपने परिवार के साथ 2BHK Flat में रहने लगा। भाई-बहन अच्छे स्कूल और कॉलेज जाने लगे। इस बीच उनके पिता की मृत्यु हो गई। उन्होंने अपने पिता के जाने के एक साल बाद शादी कर ली। वह साहब को लड़की पसंद करने के लिए ले गया था। कुछ दिनों बाद, उसकी माँ की भी मृत्यु हो गई।
इधर साहब को भी सेवानिवृत्त हुए पाँच साल हो चुके थे। साहब अब थक चुके थे। उनके बेटे ने America में बसने का ही फैसला कर लिया था। लड़की पहले से ही Canada में बस गई थी। उनकी वजह से साहब उदास थे। उनकी पत्नी की भी तबियत इन दिनों ठीक नहीं थी।
एक दिन, सुशील को संदेश मिला कि साहब की पत्नी का निधन हो गया है। वह अपना सारा काम छोड़कर साहब के घर दौडा आया। साहब का बेटा और बेटी समय पर नहीं पहुंच सके। उनके आने से पहले अंतिम संस्कार कर दिया था। लेकिन सुशील ने साहब को कोई कमी महसूस नहीं होने दी। उन्होंने तेरहवें दिन तक के सभी खर्चों का भुगतान किया।
आखिरकार, साहब के बेटे ने साहब को अमेरिका जाने का आग्रह किया लेकिन साहब ने देश छोड़ने से साफ मना कर दिया। सबके चले जाने के बाद, साहब का अकेलापन शुरू हो गया। सुशिल को यह देखा नहीं जा रहा था। पर सुशिल का भी नाइलाज था।
एक दिन वह अपनी पत्नी को साथ लेकर साहब के घर पहुंचा। साहब उसे देखकर हैरान हो गए। "साहब, मुझपर आपका बहुत एहसान है। क्या आज आप मेरी और एक सहायता करोगे?"
"अरे, अब तुझे सहायता की क्या आवश्यकता है? तु अभी बहुत बड़ा हो गया है। फिर भी ठीक है, मुझे बता, मै तेरी क्या सहायता करू?"
"क्या आप मेरे पिता बनोगे, साहब?"
साहब दंग रह गए। फिर उन्होंने कहा, "अरे, पगले, मैंने तुझे पहले से ही अपना बेटा मान लिया है।"
हाथ जोड़कर सुशील ने कहा, "फिर मुझे बेटे की फर्ज अदा करने का मोका दीजिए। मैं आपको मेरे घर ले जाने के लिए आया हूं। मैं आपकी बाकी जिंदगी मेरे साथ बिताने का अनुरोध करता हूं।"
"अरे, लेकिन क्या तुने तेरी पत्नी से पूछा?"
"साहब, मैंने उसे पूछने के बाद यह फैसला लिया है। उसके भी पिता नहीं है। अगर उसे पिता की तरह आप जैसै ससुर मिलते है, तो वह भी यह चाहती है। इसके अलावा, जब हमारे बच्चे होंगे, तो उनको भी दादाजी की जरूरत पडेगी!"
"देखो भाई। बुढ़ापा बहुत बुरा होता है। अगर मैं बीमार हो जाऊं तो आपको सब कुछ करना पड़ेगा।"
"सुशील ने कहाँ, बेटा होनेपर यह सब करना होता है साहब, मैं ये सब सोचकर ही आया हूँ।"
साहब सोच में पड़ गए फिर उन्होंने कहा, "ठीक है, मैं आता हूँ, लेकिन मेरी एक शर्त है। मुझे तु साहब करके नहीं बुलाएगा।"
"मैं मेरे पिताजी को बापू कहता था। आपको भी वहीं कहूँगा"
साहब खुलकर मुस्कुराए।
"मेरी एक और शर्त है। तेरे जैसे समाज में बहुतसारे सुशील हैं, उन्हें सहायता की आवश्यकता है। उन्हें भी सुशिल से सुशील सेठ बनाने के लिए मेरी मदद करनी होगी "
सुशील भावूक हो गया और उसने साहब को गले लगाया। दोनों काफी देर तक रोते रहे।
धन्यवाद ....!
*साथियों, भले ही इस कहानी की रचना काल्पनिक है, अगर हम सब प्रयास करते हैं, तो अपने समाज में गरीब और जरूरतमंद भाइयों की जरूरतों को समझकर उन्हें सहायता करनेपर, निश्चितरूप से सुशील जैसे बहुतसे सुशिल सेठ बना सकते हैं। जब सुशील जैसे समाज साथी आगे बढ़ेंगे, तो हमारा समाज भी अपने आप आगे बढ़ेगा ...*
तो क्या आप सुशील जैसे भाइयों के बापू बनने के लिए आगे बढ़ोगे? सोचो, समझो और आगे बढ़ो .. सुशील की तरह कोई आपका इंतज़ार कर रहा है।
B Positive


0 Comments